E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल
Wrutuja pandharpure
29 May 2025
मध्य महाराष्ट्रात प्रगती; घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
पुणे
: नैऋत्य मोसमी पावसाची वेगवान वाटचाल सुरूच आहे. बुधवारी मान्सूनने मुंबई, अहिल्यानगर भागात प्रगती केली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, हिगोली, नांदेड, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.
मान्सूनने काल कर्नाटकच्या उर्वरित भागात, तेलंगणाच्या बहुतांश भागात, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागात, छत्तीसगड आणि ओडिशाच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, तंदेवाडा, गोलपारा, अगरताळा या भागातून जात आहे. पुढील दोन दिवसांत ईशान्यकडील राज्यामध्ये छत्तीसगड आणि ओडिसाच्या काही भागात पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, राज्यात कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवस, विदर्भात आज (गुरूवार) आणि उद्या (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात दोन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, कोल्हापूर घाट विभाग, नागपूर, वाशिम, वर्धा, भंडारा आणि यवतमाळ अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व वीजांच कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात काल नागपूर येथे उच्चांकी ३९.४ अंश कमाल तपमानाची नोंद झाली.
पुणे व परिसरात दोन दिवस आकाश सामान्यता ढगाळ असणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. काल सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी शहराच्या मध्य वस्तीसह उपनगरात सुमारे आर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे.
Related
Articles
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार